Loading
अमरावती 23 जुलै अमरावती
जिल्ह्यात पुरामुळे ८५ किमीचे ५४ रस्ते, १५ पूल व काही रपटे खराय झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते आणि पूल पावसाळ्यात धोकादायक ठरत असून याकरिता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाकडे ७०० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, अद्याप निधी अप्राप्त
आहे. त्यामुळे निधीअभावी या खराब रस्त्यांचे बांधकाम रखडले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते आणि पुलांच्या मेंटनन्सची जबाबदारीदेखील पाच विभागाकडे आहे. अशा एकूण ७ हजार किमीचे रस्ते जिल्हा ग्रामीण रस्ते अंतर्गत आहे. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ८५ किमीचे ५४ रस्ते, १५ पूल यासोबत रपटे, मोठी नाली खराच झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून अशा ८८ कामांची वार्टी तयारी करून शासनाकडे २,७५४ कोटींच्या निधीची मागणी दुरुस्तीकरिता करण्यात आली होती. परंतु शासनाकडून सदरचा प्रस्ताव पुन्हा तयार करीत अतिमहत्याच्या रस्ते आणि पुलांकरिता ७०० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली. या पावसाळ्यातदेखील ५४ रस्ते, १५ फूल, रपटे आणि मोठी नाती है दुरुस्ती अभावी धोकादायक ठरत आहे, त्यामुळे या वर्षात या रस्त्यांना दुरुस्तीकरिता निधी मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यातीलखराब झालेले रस्ते आणि पूल, रपटे, नाली अशा ७५ कामांची यादी शासनाकडे पाठविली आहे. याच्या दुरूस्तीकरिता ७०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी मंजूर झाल्यास पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले