Mar, 12 2026

Maharashtrachi Hasyajatra फेम अभिनेत्याची नवी झेप, झळकणार तेलुगु सीरिजमध्ये; चाहत्यांची उत्सुकता शिगेला


Image Source By : Digital Satta

Maharashtrachi Hasyajatra Fame Tejas Raut; Maharashtrachi Hasyajatra फेम अभिनेत्याची नवी झेप, झळकणार तेलुगु सीरिजमध्ये; चाहत्यांची उत्सुकता शिगेला


Maharashtrachi Hasyajatra Fame Tejas Raut Play Role In Telugu Jatara Series

Maharashtrachi Hasyajatra फेम अभिनेत्याची नवी झेप, झळकणार तेलुगु सीरिजमध्ये; चाहत्यांची उत्सुकता शिगेला


महत्वाचे मुद्दे

  • Maharashtrachi Hasya...
  • ...

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम तेजस राऊत तेलुगु सीरिजमध्ये झळकणार आहे.

' महाराष्ट्राची हास्यजत्रा ' हा लोकप्रिय कार्यक्रम असून त्यातील प्रत्येक कलाकार कायम चर्चेत असतात. या कार्यक्रमानं अनेक नोविदत कलाकारांना पडद्यावर झळकण्याची संधी दिली. हास्यजत्रेमुळे काही कलाकार घराघरात पोहोचले आणि लोकप्रिय झाले. या कलाकारांपैकी एक म्हणजेच तेजस राऊत . तेजस राऊतने महाविद्यालयीन स्तरावर अनेक एकांकिका केल्या. त्यानंतर तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातही दिसला. यामुळे तो घराघरात पोहोचला. हास्यजत्रेनंतर अभिनेत्यानं नाना पाटेकर यांच्यासोबत 'वनवास' हा सिनेमा केला. त्यानंतर तेजस राऊत, गाजलेल्या 'गुलकंद' या मराठी सिनेमातही झळकला. अशातच आता अभिनेता एका तेलुगु सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Ramesh Pardeshi : 'नशा करून एक तरुण पहुडला होता' रमेश परदेशी यांची पोस्ट, जनतेला आवाहन करत म्हणाले, 'समाज म्हणून...'

भरघोस यशानंतर तेजस राऊत आता 'जत्रा' या तेलुगु सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी 'चाय शॉट्स' या अॅपवर ही सीरिज प्रसारित करण्यात आली आहे. 'जत्रा' या सीरिजचं दिग्दर्शन आणि लेखन शंभूप्रसाद भोसले यांनी केलं असून अनुज शिंदे हा या सीरिजचा असोशिएट डायरेक्टर आहे. 'जत्रा' ही सीरिज रॉम-कॉम असून मुरबाड येथील म्हसाच्या जत्रेत या सीरिजचं शुटिंग झालं आहे.

'माझ्या किडन्या शट डाऊन झालेल्या' RJ Sumit नं केलाय गंभीर आजाराचा सामना; म्हणाला, 'तुमच्या प्रेमामुळे आज मी जिवंत...'

वैष्णवी आंबवणे मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर संजय गोसावी, यज्ञेश पवार आणि साक्षी लिंगायत यांसारखे कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तेजस राऊतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या नव्या सीरिजची माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

'जत्रा' या सीरिजबद्दल सांगायचं तर, या सीरिजचे DOP राज बांगर आणि हेमंत फुलपगार आहेत. तसेच संकेत जाधव हे या सीरिजचे EP आहेत.

अरुण कदम आणि प्रभाकर मोरे यांची डायलॉग न विसरण्याची ट्रिक, ऐकून तुम्ही ही पोट धरून हसाल

दरम्यान, तेजस राऊतच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं हास्यजत्रामधून

छाप पाडलीच, पण त्याचबरोबर गुलकंद सिनेमातील भुमिकेसाठीही त्याचं कौतुक करण्यात आलं. त्याचबरोबर अभिनेता झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वात झळकला होता.

"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Rohan Gujar wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी दिली गोड बातमी, खास व्हिडिओ व्हायरल

Virosh Wedding: आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले रश्मिका आणि विजय, संगीत सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल

'माझ्या किडन्या शट डाऊन झालेल्या' RJ Sumit नं केलाय गंभीर आजाराचा सामना; म्हणाला, 'तुमच्या प्रेमामुळे आज मी जिवंत...'

Ramesh Pardeshi : 'नशा करून एक तरुण पहुडला होता' रमेश परदेशी यांची पोस्ट, जनतेला आवाहन करत म्हणाले, 'समाज म्हणून...'

Bigg Boss Marathi 6 च्या घरात वातावरण तापलं, टोळी कायमचीच फुटली; अनुश्री माने ढसाढसा रडली, प्रोमो व्हायरल

वादात अडकलेल्या Palash Muchhal याला बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा, खूप चांगली व्यक्ती म्हणत कौतुक

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad