Mar, 13 2026

अमरावती : एक हजार लाडक्या बहिणीने घेतली मदत कक्षाची मदत


Image Source By : Digital Satta

अमरावती, 22 जुलै 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने 'अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी मदत मिळावी आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर निराकरण व्हावे म्हणून अमरावती येथील महिला बाल विकास भवनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष आणि 24X 7 तास 8432520301 या क्रमांकाचा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत एक हजार लाडक्या बहिणींनी फोन करून आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . कैलास घोडके यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाचे महत्त्वाकांक्षी योजना असून याद्वारे लाभार्थी महिलांना प्रति माह पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू असून अंगणवाडी सेविका , बचत गटांच्या महिला अशा वेगवेगळ्या 15 नारीशक्ती दुतामार्फत हे काम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख एकेचाळीस हजार लाडक्या बहिणीने आपली नोंदणी केली आहे . या योजनेअंतर्गत ज्यांना समस्या येतात त्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून आपल्या समस्या सोडवून अंगणवाडी सेवेकडे नाव नोंदणी करीत आहे.

महिला बालविकास विभागाकडील पर्यवेक्षिका मदत कक्षात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास सेवा देत असून उर्वरित वेळेत फोन द्वारे 24 तास सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना समजेल आणि त्यांना मदत होईल अशा भाषेत पर्यवेक्षिकांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे संपर्क साधणाऱ्या महिलांचे समाधान झालेले दिसून येत आहे.

महिला व बाल विकास भवन येथील महिला मदत कक्ष आणि हेल्पलाइन नंबर महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून याद्वारे महिलांना घरबसल्या आपल्या समस्यांचे निराकरण करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरणे सुकर होत आहे. - मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा

तालुक्यानुसार प्राप्त अर्ज :अमरावती 19372भातकुली 15177 तिवसा 11756अचलपूर 26095 अंजनगाव 6303दर्यापूर 13904चांदूरबाजार 15171चांदुर रेल्वे 10367धामणगाव 9365नांदगाव 17020वरूड 13478 मोर्शी 13477चिखलदरा 10470धारणी 14980नागरी भाग 44540एकूण प्राप्त अर्ज 2 लाख 41 हजार 475

ad