Mar, 14 2026

अमरावती सिटी बस बंद, ऑटो चालकांची मनमानी वाढली


Image Source By : Digital Satta

अमरावती, 19 जुलै 

रविवार १४ जुलै रोजी बसस्थानक परिसरात भरधावसिटीबसने चिरडल्याने एका ९ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील भंगार सिटीबसच्या फिटनेसची तपासणी करण्याची जाग पोलिस प्रशासनाला आली. त्यामुळे सीपी रेड्डी यांनी जो पर्यंत सर्व सिटीबसची आरटीओ व्दारे फिटनेस व कागदपत्रांची तपासणी होत नाही तो पर्यंत सिटीबस रस्त्यावर धावणार नसल्याचे आदेश दिल्याने सध्याघडीला शहरातील सिटी बससेवा चार दिवसांपासून बंद आहे. आरटीओमध्ये आतापर्यंत केवळ ५ बसची फिटनेस तपासणी पूर्ण झाली. तर दुसरीकडे सिटीबस बंद असल्याने ऑटोचालकांनी प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करायला सुरूवात केल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

महानगर पालिकेने सिटी बसचा कंत्राट महेश साहू यांना दिला आहे. महेश साहू यांनी प्रसार माध्यमांना ऑनकॅमेरा दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे २५ सिटीबस असून त्यापैकी आतापर्यंत शहरातील रस्त्यावर १८ सिटी बस धावत होत्या.प्रितमच्या मृत्यूनंतर शहरात गेल्या अनेक वर्षापासून धावणाऱ्या भंगार सिटीबसेसची तपासणी करण्याची जाग पोलिस विभागाला आली. त्यामुळे सीपी रेड्डी यांनी जोपर्यंत आरटीओमार्फतसर्व सिटीबसच्या फिटनेस व कागदपत्रांची तपासणी होत नाही तोपर्यंत एकाही सिटी बस रस्त्यावर धावणार नसल्याने फर्मान सीपींनी सोडले. त्यामुळे १५ जुलै पासून शहरातील सिटीबस सेवा ठप्प पडल्याने नागरिकांचे हाल सुरू आहे. आरटीओ कार्यालयाव्दारे आतापर्यंत केवळ ५ सिटीबसच्या फिटनेसची तपासणी झाली. उर्वरित तपासणी सुरू असून चार ते पास दिवसत उर्वरित बसेसची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच शहरातील रस्त्यांवर सिटीबस धावणार आहे. तर दुसरीकडे सिटी बस सेवा बंद असल्याने ऑटोचालक प्रवाशाकडून मनमानी पध्दतीने भाडेवाढ करित असल्याने प्रवाशांच्या खिशावर ताणा वाढला आहे.

ad