Mar, 13 2026

आमदार टी राजा यांची तिवसा पोलिसांकडून अर्धा तास विचारपूस


Image Source By : Hindustan Samachar

अमरावती 28 ऑगस्ट 

तेलंगणाचा वादग्रस्त भाजप आमदार टी. राजा अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून आज परतवाडा येथे दहीहंडी कार्यक्रमात ते उपस्थित राहणाऱ्यासाठी अमरावतीत दाखल झाले होते. दरम्यान तिवसा पोलिसानी त्यांना रोखून पोलीस ठाण्यात २० मिनिट चौकशी व त्याची विचारपूस करत अमरावती जिल्ह्यात वादग्रस्त व जातीय किंवा धर्माध भाषण केल्यास कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल, अशी तंबी दिली. टी राजा यांचा वादग्रस्त वक्तव्य करण्याचा इतिहास आहे. त्यामुळे जुनी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी त्याला सामाजिक सलोखा टिकून राहिल, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

तेलंगणातील भाजपचे नेते, प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले टी. राजा सिंह हे मंगळवारी नागपूरहूनअमरावती जिल्ह्यात दहीहंडी स्पर्धे साठी आले असता त्यांना ५.३० वाजता दरम्यान शहरातील पेट्रोल पंप चौकात बेरीकेट्स लावून रोखण्यात आले. तेथून पोलीस बंदोबस्तमध्ये त्यांना तिवसा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. अचानक एवढ्या मोठ्या वाहनांचा ताफा पाहून तिवसा पोलीस स्टेशनसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आमदार टी राजा सिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. त्यामुळेच त्यांना तिवसा येथे डिटेन करत तासभऱ्यात नोटीस देऊन सोडण्यात आले.

ad