Loading
अमरावती28 ऑगस्ट शहरात साफसफाई,मालमत्ता करात झालेली भरमसाठ वाढ, घनकचरा व्यवस्थापनाची वाट लागली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डेंग्यूच्या रुग्णासह साथीचे रोग वाढत आहेत. महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. नागरिकांच्या समस्या व कारभारासंदर्भात अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महापालिकेच्या महापालिका चांगलीच कानउघडणी केली.
महापालिकेत गत तीन वर्षांपासून प्रशासक राजवट अमरावतीकर अनुभवत आहे. गत काळामध्ये महानगरपालिकेत प्रशासकांचे अनेक निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता करांमध्ये करण्यात आलेली करवाढ, साफसफाईचे झोन निहाय कंत्राट, मोठ्या प्रमाणात शहर विकास आराखड्यातील बदलविलेली आरक्षणे याच पार्श्वभूमीवर खा. बळवंत वानखडे यांनी मंगळवार रोजी आढावा बैठक घेतली. अमरावती महानगरात गत काही महिन्यांपासून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शहरात अस्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचे मूळ साफसफाईची नवी व्यवस्था झोन निहाय करण्यात दडलेले आहे.या बेठकी दरम्यान नवीन करप्रणाली लागू करू नये या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.