Mar, 13 2026

गोंदियात बापाने दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या लेकाची दगडाने ठेचून केली हत्या


Image Source By : Digital Satta

गोंदिया, 19 ऑगस्ट 

- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुल्ला गावात बापाने पोटच्याच मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृतकामध्ये 32 वर्षीय हंसराज नारायण मुनेश्वर याचा समावेश आहे.

हंसराजने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सालई येथे पाठविले होते हंसराजला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी मुल्ला येथे पोहोचला. घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले. भांडण एवढे विकोपाला गेले की मारहाण झाली. यातच बाप-लेकाच्या हाणामारीत मुलाच्या डोक्यावर वडिलांने दगडाने मार हाण केली असता मुलाचा अंगणात मृत्यू झाला याची माहिती गावाकऱ्यांनी देवरी पोलिसांना दिली असून देवरी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे‌

ad