Loading
चंद्रपूर, 29 जुलै चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अकरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. काल पावसाने रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही मार्ग अद्यापही बंद असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अकरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. यामुळे नदी, नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत.बल्लारपूर तालुक्यातील इरई नदीवरचा पूल चारवट- माना मार्ग वाहतुकीकरिता बंद आहे .पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पाण्यामुळे पूल पाण्याखाली गेल्याने देवडा खू - थेरगाव, पोंभूर्णा - वेळवा हे मार्ग बंद आहेत. चिंचोली अंतरगाव मार्ग देखील बंद आहे.पुराच्या पाण्यात वाहने घालू नका, असे आवाहन केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडत आहेत. चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यातून कार चालवणे चांगलेच महागात पडले आहे. शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीच्या कमी उंचीचा पूलावरून कार घातली होती. अत्यंत खळाळणारा प्रवाह दिसत असतानाही या कारमधील दोघांनी कार पुढे दामटली. मात्र, अर्ध्या रस्त्यात कार हेलकावे घेऊ लागली. थोड्या वेळातच कार पुलावरून खाली कोसळली. कारमधील दोघांनी कारचा दरवाजा उघडून कसाबसा झाडाचा आधार घेतल्याने थोडक्यात बचावले आहेत.