Mar, 13 2026

डोंबिवलीत तरुणीने रुग्णवाहिकेतून येत बजावला मतदानाचा हक्क


Image Source By : Digital Satta

डोंबिवली, 21 मे, (हिं. स) : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एका तरुणीने रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉक्टरांच्या परवानगीने मतदान केले. सदर तरुणीने मतदान केंद्रापर्यत रुग्णवाहिकेतून प्रवास करीत मतदान केंद्र गाठले. या तरुणीला शिवसैनिक संदेश पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले तिने त्यांचेही आभार मानले.

लोकसभेच्या निवडणुकीत तरुण वर्ग यावेळी उत्सुक होता. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. डोंबिवली पश्चिमकडील प्रणाली महेंद्र साळुंखे या तरुणीवर गेले सहा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आपले मत वाया जाऊ नये म्हणून या तरुणीने शिवसैनिक संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. मला मतदान करायचे आहे अशी इच्छा तरुणीने त्यांना व्यक्त करताच पाटील यांनी रुग्णवाहिक उपलब्ध केली. मतदान केंद्रापर्यत रुग्णवाहिकेतून तरुणी आली आणि तिने मतदानाचा हक्क बजावला. तिच्या या धडासाबद्दल सर्व स्तरातून कौतुक झाल्याचे संदेश पाटील यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

ad