Mar, 13 2026

नगरच्या जलतरणपटू अमितसिंग राजपूतची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड


Image Source By : Digital Satta

अहमदनगर, 5 ऑगस्ट

नगर शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग दीपक राजपूत याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.नुकतेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अम्रित सिंग राजपूत याने ५० मीटर बटरफ्लाय या क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी राजपूत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

त्याची ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा असून, त्याला जिल्हा संघाचे मार्गदर्शक सर्वेश देशमुख, अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण,विश्‍वजीत चव्हाण,कराळे जलतरण तलावाचे करण कराळे, उदय कराळे,अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.राज पूत हा सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा 9 वी च्या वर्गातील विद्यार्थी आहे.

ad