Mar, 13 2026

नगर : म्हसणे येथील तुकाई मंदिर परिसरात एक हजार वृक्षांची लागवड


Image Source By : Digital Satta

अहमदनगर, 20 जुलै 

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या वतीने म्हसणे सुलतानपूर (तालुका पारनेर) येथील तुकाई मंदिर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे व युनिटी बिल्ड टेक प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून १ हजार झाडांची लागवड करण्यात आली.

या अभियानाचा शुभारंभ भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आढाव यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आला.

प्रतीक शेळके म्हणाले की, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो,याची जाणीव ठेऊन निसर्गाचे देणे लागते या भावनेने प्रत्येकाने वृक्षारोपण करावे.निसर्गाप्रती प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना वृध्दींगत झाल्यास पर्यावरण संवर्धन चळवळीला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ad