Mar, 13 2026

निवडणुकीपूर्वी कन्हैय्या कुमार ईश्वर चरणी


Image Source By : Digital Satta

सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून घेतला आशीर्वाद

नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) : काँग्रेसचे वादग्रस्त नेते कन्हैय्या कुमार यांनी आज, सोमवारी उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन देवाना नमस्कार केला. तसेच सर्वच धर्माच्या धर्मगुरुंकडून विजयासाठी आशीर्वाद घेतला. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी कन्हैय्या डाव्या पक्षात होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी त्यांना झालेले देवाचे स्मरण हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय.

मुस्लिमबहुल उत्तर पूर्व दिल्लीच्या जागेवर भाजपाचे मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात लढत होणार आहे. मनोज तिवारी हे येथून दोन वेळा खासदार आहेत तर कन्हैया कुमार हे पहिल्यांदाच या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. कन्हैया कुमार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच बेगुसराय मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली होती, पण त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता उत्तर पूर्व दिल्लीतील कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 10 जागा आहेत. यामध्ये बुराडी, तिमारपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंडा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद आणि करावल नगर या जागांचा समावेश आहे. या 10 विधानसभा जागांपैकी रोहतास नगर, घोंडा आणि करवल नगरमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर उर्वरित 7 आमदार आम आदमी पक्षाचे (आप) आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मतदान पद्धत वेगळी आहे. त्यामुळे लोकसभेची लढत चुरशीची असणार आहे.

भाजपाने मनोज तिवारी यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील 7 पैकी 6 खासदारांची तिकिटे भाजपाने रद्द करून त्यांच्या जागी नवीन चेहरे उभे केले आहेत, तर मनोज तिवारी हे एकमेव खासदार आहेत, ज्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे. मनोज तिवारी यांनी उत्तर पूर्व दिल्ली जागेवर जेपी अग्रवाल आणि शीला दीक्षित यांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव केला आहे. यावेळी दिल्लीत काँग्रेस 3 जागांवर तर आम आदमी पार्टी 4 जागांवर निवडणूक लढवत आहे.

हिंदुस्थान समाचा

ad