Mar, 13 2026

पुणे :आरोप नसलेल्या व्यक्तीची कुलसचिव पदाची निवड करून नाव जाहीर करावे


Image Source By : Digital Satta

पुणे, 7 ऑगस्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी. कोणताही आरोप नसलेल्या व्यक्तीची निवड करून नाव जाहीर करावे, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली. याविषयी त्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना निवेदनाद्वारे दिले आहे. या पदाच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाकडे वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. यादव म्हणाले की, ‘‘सबळ पुरावे देऊन सुद्धा विद्यापीठाने काही व्यक्तींच्या दबावाखाली येऊन वादग्रस्त व्यक्तीचीच निवड कशी होईल, या दृष्टीने सतत पावले टाकली आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. विद्यापीठाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तक्रारदारांची सुनावणी घेतली. या सुनावणीला उपस्थित राहून आम्ही आमच्याकडे असणारी सर्व कागदपत्रे न्यायाधीशांना सादर केली. वादग्रस्त व्यक्तीसाठी समिती स्थापन करून विद्यापीठाने केलेला खटाटोप शंकास्पद होता. नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याच संस्थेने निलंबित केले आहे. आता अशा व्यक्तीची निवड होणार का, याचा खुलासा विद्यापीठाने तत्काळ करावा.’’विद्यापीठाकडे या पूर्वीही अनेक प्रकारचा पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यास विद्यापीठाने उत्तरे दिलेली नाहीत. आता या पत्राचे तरी उत्तर मिळेल, अशी अपेक्षा असल्याचेही यादव यांनी नमूद केले आहे.

ad