Loading
पुणे, 7 ऑगस्ट पुणे शहरात गेल्या काही आठवड्यापासून झिकाचे रुग्ण आढळत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून एकाही रुग्ण आढळलेला नाही. तसेच २६ गरोदर महिलांसह ६६ जणांना झिकाची लागण झाली होती. ते सर्वजण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे शहरात २० जून रोजी पहिला झिकाचा रुग्ण आढळून आलेला होती. त्यानंतर एरंडवणे, मुंढवा भागातही रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी, संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. २० जून ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शहरात एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली. गर्भवती महिलांना झिकाचे धोका असल्याने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली जात होती. आत्तापर्यंत २६ गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली. त्यापैकी २३ महिलांची १६ जास्त आठवड्याची गर्भधारणा असल्याने त्यांची ॲनोमॅली स्कॅन करण्यात आले. त्यात काहीही गंभीर आढळून आलेले नाही.