Mar, 13 2026

पुणे - भिडेवाड्यातील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार


Image Source By : Digital Satta

पुणे, 9 ऑगस्ट महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्यातील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या १६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पुण्यात होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले, तरी पंतप्रधान या वाड्याला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

यानिमित्ताने पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. या भूमिपूजनासह स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मेट्रो मार्ग, स्वारगेट- कात्रज मार्गाचे भूमिपूजन आणि वाघोली, तसेच चांदणी चौकापर्यंत मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे कामही यानिमित्ताने सुरू केले जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन, तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे नियोजनही प्रशासनाकडून सुरू आहे. शासनाकडून याबाबतचे निर्देश नुकतेच महापालिकेस देण्यात आले आहेत.

ad