Mar, 13 2026

यारी जॅम मध्ये सनम, लिझा, झेडेन आणि अनुव जैन यांनी छेडले प्रेक्षकांच्या मनातील सूर


Image Source By : Digital Satta

मुंबई, 6 ऑगस्ट हाऊस ऑफ मॅकडॉवेल्स सोडा यारी जॅम च्या माध्यमातून या विकेंड ला मुंबईतील एनएससीआय डोम मध्ये अजोड अशा मैत्री विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेन झीचे अतिशय आवडीचे गायक सनम, लिझा, रित्विझ, झेडेन अनुव जैन आणि लोतिका यांनी आपल्या केलेचे सादरीकरण केले.

हाऊस ऑफ मॅकडॉवेल्स सोडा ने नेहमीच हृदयस्पर्शी अशा यारीच्या म्हणजेच मैत्री आणि एकनिष्ठतेच्या कथानकांसाठी सहकार्य केले आहे. यारोंवाली बात मध्ये अर्थपूर्ण जोडणीची उर्जा अधोरेखित केली असून कशा प्रकारे अगदी छोट्या कामामुळे दीर्घकालीन परिणाम साधला जातो हे दर्शवले आहे. यारी जॅम ने नेहमीच अपेक्षा उंचावल्या असून यामध्ये फ्रेंडशिप डे ला अतिशय आकर्षक सणामध्ये परावर्तित केले आहे. संपूर्ण मुंबईतील फॅन्सनी या संध्याकाळच्या उर्जायुक्त गाण्यांचा आस्वाद घेऊन त्यांच्या आवडीच्या कलाकारांच्या गाण्यांवर नृत्य करण्याचाही आनंद घेतला.

डियाजिओ इंडिया च्या मार्केटिंग च व्हाईस प्रेसिडेंट आणि पोर्टफोलिओ हेड वरुण कुरीच यांनी सांगितले “ हाऊस ऑफ मॅकडॉवेल्स सोडा वर आमचा असा विश्वास आहे की मैत्रीची शक्ती ही बदल घडवते आणि व्यक्तीला उर्जावान बनवते. या वर्षी यारी जॅम ने सर्व अपेक्षा पार करुन अनेक उर्जावान कलाकारांची मांदियाळी निर्माण केली, ज्यामुळे मैत्री साजरी करण्यामध्ये नवीन उंची प्रस्थापित झाली आहे. संपूर्ण देशातील मित्रांना एकत्र आणण्यासह सौहार्द पूर्ण संबंध वाढवत आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करण्याची आम्ही संधी देत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आणखी एक पाऊल टाकत मैत्री आणि आनंदाचे पर्व साजरे करत आहोत तसेच हा फ्रेन्डशिप डे आनंददायी आणि उर्जावान करत आहोत.”

या प्रसंगी बोलतांना सनम म्हणते “ यारी जॅम मध्ये कार्यक्रम करणे म्हणजे एक अनोखा अनुभव असतो कारण हा केवळ एक कार्यक्रम नसतो. आमच्यासाठी दोस्ती म्हणजे आम्ही जे करतो त्याच्या अगदी जवळची असते, म्हणूनच हा कार्यक्रम आमच्यासाठी विशेष असा होता. यामध्ये आपली घट्ट मैत्री ही हाऊस ऑफ मॅकडॉवेल्स सोडा च्या ‘यारों वाली बात’ च्या तत्वज्ञानानुसार होते. खरोखरच हा कार्यक्रम आम्ही आयुष्यात विसरणार नाही.”

यावेळी बोलतांना लिझा मिश्रा म्हणाली “ तुम्ही जे संगीत जिवंत करता त्यासाठी हा मंच एक कॅन्व्हास प्रमाणे बनला. आम्ही यारी जॅम मध्ये काहीतरील विशेष करण्यासाठी एकत्र आलो, यामध्ये आंम्हाला भरपूर उर्जा, जोडण्या आणि अविस्मरणीय क्षण अनुभवता आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमचे संगीताचे प्रेम आणि मैत्री दोन्हीचा आनंद साजरा करु शकलो.”

झेडेन म्हणतो “ यारी जॅमचा एक भाग होणे म्हणजे केवळ कला सादर करणे नव्हे तर संगिताच्या माध्यमातून मैत्री साजरी करणे होय. प्रेक्षकांची उर्जा आणि प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन देणे यांमुळे मी नवीन सेट तयार करण्यासाठी खूपच उत्साही होतो. मुंबई ही नेहमीप्रमाणे खूपच उत्साही होती आणि माझ्या आवडीच्या कलाकारांमुळे सुध्दा हा कार्यक्रम अगदी अविस्मरणीय असा झाला.”

ad