Loading
मुंबई, २९ ऑगस्ट पाकिस्तानी दहशतवादी फरहातुल्ला घोरीने टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओद्वारे भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः दिल्ली आणि मुंबईच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
या धमकीमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) चिंता वाढली असून, देशभरात सुरक्षा उपायांमध्ये तातडीने वाढ केली जात आहे. व्हिडीओमध्ये घोरीने भारतातील पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची योजना जाहीरपणे मांडली आहे, ज्यामुळे देशातील सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. देशाच्या एकात्मता आणि सुरक्षिततेला मोठे आव्हान निर्माण झाल्याने, संपूर्ण देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.