Mar, 13 2026

विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू


Image Source By : Digital Satta

मुंबई, 31 मे (हिं.स.) : मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पूर्व परिसरात असलेल्या म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सूर्यकांत म्हादळकर आणि शरद म्हसाळ अशी मृतकांची नावे आहेत.

विक्रोळीतील म्हाडाच्या 40 क्रमांकाच्या इमारतीतील एका घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे म्हाडाच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही इमारत किती वर्षे जुनी आहे ? इमारत ही धोकादायक स्थितीत आहे का ? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे या दुर्घटनेमुळे चिंता वाढली आहे. मात्र, या दुर्घटनेवर म्हाडाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ad