Mar, 14 2026

शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करा - खा. बोंडे


Image Source By : Digital Satta

अमरावती, 1 ऑगस्ट, दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात बुधवारी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी शुन्य प्रहरमध्ये अचलपुर ते मुर्तिजापुरमार्गे यवतमाळपर्यंत धावणार्‍या शकुंतला रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला. सरकारचे लक्ष वेधून त्यांनी ही रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. खा. अनिल बोंडे यांनी पुढे म्हणाले, अचलपुर - मुर्तिजापुर - यवतमाळ हा रेल्वे मार्ग इंग्रज कंपनीच्या ताब्यात होता. परंतु, काही वर्षापूर्वी हा मार्ग सरकारने नेलसन कंपनीच्या ताब्यातुन परत घेतला. त्याचे पुढे नॅरोगेज मधून ब्रॉड गेज मध्ये रूपांतरण करणे बाकी आहे.

इंग्रज काळात नफ्यात असलेला हा मार्ग अचलपुर, मुर्तीजापुर, यवतमाळ या भागातला कापूस, कपडा व्यापार करायचा मुख्य मार्ग होता. परंतु, हा मार्ग गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेला आहे. हा मार्ग सुरू झाल्यास मेळघाट तसेच अचलपुर, दर्यापुर, यवतमाळ हा भाग थेट दिल्ली ते मुंबईपर्यंत जोडता येणार आहे. हा मार्ग सुरू करण्याकरिता रेल्वेला जागेचा प्रश्न नाही. कारण, रेल्वेकडे ती जागा आधीच असून फक्त ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करावे लागणार आहे. केंद्र सरकारने या मार्गाकडे लक्ष देऊन हा मार्ग सुरू करण्याची मागणी खासदार डॉ अनिल बोडे यांनी केली. माजी खा नवनीत राणा यांनी देखील गेल्या वर्षी अधिवेशनात शंकुतला रेलवेचा मुद्दा उपस्थित केला होता.

ad