Mar, 13 2026

शिवसेनेचे जिल्हाप्रमुखासह चालकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा


Image Source By : Digital Satta

सोलापूर , 3 जुलै अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याची फिर्याद ठेकेदार आकाश उत्तम कानडे (वय २३, रा. मानेगाव, ता. बार्शी यांनी दिली आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०८ (३), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ठेकेदार आहेत. सकाळी ११ च्या सुमारास इंजिनिअर दीपक रामचंद्र कुंभार यांनी मनीष काळज़े याच्या सात रस्ता येथील कार्यालयात घेऊन गेले. तेथे नमूद लोकांनी फिर्यादीला एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रुपयांचे आहे. त्याच्या १५ टक्केप्रमाणे ११ लाख रुपयांची मागणी केली. यावर फिर्यादीने नकार दिल्याने त्यास दमदाटी व शिवीगाळ करुन ‘तुला काम कसे मिळते ते पाहतो. तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार’ अशी दमदाटी केली.

ad