Loading
अकोला, 13 जुलै, अकोल्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजरूक गावाच्या भाजपच्या सरपंच असलेल्या डॉ. कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. पळसपगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. हिंगणी बुजरूक हे गोपाल दातकरांचे यांचे गाव आहे. भाजपने जाणीवपुर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा आरोप दातकर यांनी केला आहे.
अवघ्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. अकोला पूर्व मतदारसंघासाठी विधानसभेसाठी ठाकरे गटाचे दावेदार म्हणून दातकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान दातकर यांच्यावर गुन्हा का दाखल केला असे म्हणत याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज दुपारी पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली. दरम्यान भाजपच्या एका आमदाराच्या दबावानं हा गुन्हा दाखल झाल्याचा देशमुखांचा आरोप.
शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख तथा जिल्हा प्रमुख सदस्य गोपाल दातकर यांच्यावर गुन्हे दाखल झाला आहे. शहर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रमाणे ॲट्रॉसिटी अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले. एका महिला सरपंच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच अकोल्यात ठाकरेंची शिवसेना चांगलीचं आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि शिवसेनाच्या पदधिकार्यांनी आज अकोला पोलिस अधिक्षक कार्यालय गाठलं अन् पोलिस अधिक्षकांना सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या एका आमदाराच्या दबावानं हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात काही ऑडिओ क्लिप देखील हाती लागले असल्याचे देशमुख म्हटले. लवकर भाजपचा तो आमदार सर्वांसमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान अकोला जिल्हा परिषदमध्ये 11 जुलै रोजी गोपाल दातकर आणि त्यांचा समवेत ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि हिंगणी गावचे सरपंच महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर सरपंच महिलांच्या तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक होत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर काही व्हिडिओ तपासून सखोल चौकशी करावी. आणि दातकर यांच्या दाखल केलेला गुन्हा भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून केल्याचे ते म्हटले.
भाजप शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर!
निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना(उबाठा) असा वाद रंगण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे असाच सामना होणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना ठाकरे गट सोडत नाही. अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा काँग्रेसच्या उमेदवाराला मोठा फायदा झाला. जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे.