Mar, 13 2026

श्रीकृष्णाचे सासर व रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे भव्य कॉरिडार विकसित करण्याची मागणी


Image Source By : Digital Satta

अमरावती 28 ऑगस्ट 

अंधकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वाना मोहून टाकणारा, आणि जगाला तत्वज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मसोहळा म्हणजे जन्माष्टमी उत्सव विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील इस्कॉन मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रमांची मेजवानी व त्यानंतर रात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत व भक्ती संगीतामध्ये कृष्ण जन्म पार पडला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी भागवत व कृष्ण लीला प्रवचन संपन्न झाले.

या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी यांच्याहस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कृष्ण जन्माष्टमी निमित्य इस्कॉन मंदिराच्या वतीने आयोजित जन्माष्टमी उत्सवामध्ये परिसरातील भाविक भक्तांनी भक्तिरसाचा आनंद लुटला.

वाराणसीच्या धर्तीवर कौडण्यपूर साठी पंतप्रधान मोदीजींची भेट घेऊन भव्य कॉरिडॉर उभारण्याचा आमचा संकल्प असून, त्यासाठी प्रशासनाकडे जो पाठपुरावा आम्हाला करता येईल. तो आम्ही नक्की करू, मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे सदर प्रस्ताव सादर केला आहे. ते सुद्धा कौंडण्यपूर कॉरिडॉर साठी आमच्या सकारात्मक पाठीशी आहे, त्यामुळे तिवसा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. येत्या काळात याठिकाणी पर्यटकांची गर्दी व स्थानिकांना उद्योग व युवकांच्या हाताला काम, असा प्रोजेक्ट लवकरच तयार करू आणि देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये कौडण्यपूर चा समावेश करून अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास यावेळी रविराज देशमुख यांनी व्यक्त केला.

ad