Mar, 13 2026

आर्थिक राशिभविष्य 21 फेब्रुवारी 2026: मिथुन राशीसाठी चोरीचा धोका! मकरची आर्थिक स्थिती भक्कम! पाहा, तुमचे राशिभविष्य


Image Source By : Digital Satta

मेष राशीसाठी शनिवार ठिक आहे. तुम्हाल कामात मदत मिळेल त्यामुळे काम पूर्ण करताना फार त्रास होणार नाही. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. घरात गुंतवणुकीबाबत चर्चा होवू शकते. मुलांच्या शिक्षणासाठी, ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी काही खर्च होईल तो तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही ऑनलाइन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करत असाल तर लाभ होईल. संध्याकाळी घरात जास्त वेळ देणार तसेच नातेवाईकासोबत भेट होण्याची शक्यता आहे.


वृषभसाठी शनिवार समाधान आणि मानसिक शांतता देणार आहे.तुम्ही राजकारणात असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात काही नवीन डिल होणार आहे त्यामुळे तयार राहा आणि महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा. सरकारी अधिकारी, राजकीय ओळख किंवा नेहमी गुंतवणूक करणाऱ्यांमुळे तुमचा व्यवसाय वाढेल. तुम्ही शेती, धातू, बांधकाम आणि आयात क्षेत्रांशी संबंधित काम करत असाल तर उत्तम लाभ आहे. विरोधक थोडा त्रास देतील असे दिसते आहे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम आहे. घरात वातावरण सुख समाधानाचे असेल.

मिथुन राशीसाठी शनिवार चांगला असला तर तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. एखादी वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. मालमत्ते संदर्भात घरात वाद होवू शकतो तो होणार नाही असे पाहा. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. तुम्ही काही खरेदी करणार आहात त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी एखादे थांबलेले काम पूर्ण होवू शकते तसेच रात्री मंगल कार्यात सहभागी होण्याचा योग आहे.

कर्क राशीसाठी शनिवार चांगला असून धन प्राप्तीचे योग आहेत. नोकरीत तुमच्या हुशारीचे कौतुक होईल ज्या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट हाताळला त्याबद्दल वरिष्ठ खुष असतील. बँकिंग किंवा रिटेल क्षेत्रात काम करत असाल तर आर्थिक उलाढाल वाढणार आहे. घरात जास्त वेळ देणार असून मानसिक समाधान वाढेल. प्रवासाचा योग आहे. संध्याकाळी एखादी खुषखबर मिळाल्यामुळे मन प्रसन्न होईल.

कन्या राशीसाठी शनिवार जरा जास्तच काम करुन घेणार आहे. ऑफिसमध्ये अचानक एखादा प्रोजेक्ट येईल आणि जास्त वेळ थांबावे लागेल. तुम्ही आयटी, प्रोग्रामिंग आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असाल तर चांगली कमाई होईल. मुलांकडून खुष खबर मिळेल त्यामुळे घरात समाधान असेल. शुभ कार्यावरील खर्च वाढणार असून लवकरच घरात मंगलकार्याचे आयोजन होणार आहे.

तूळ राशीसाठी शनिवार सुखद आहे. घरात देखील सगळेजण तुमचे काम ऐकतील किंवा तुम्हाला मदत करतील. पुरेसे पैसे हाती आल्याने समाधान असेल. प्रवासाचा योग असून त्यात चांगला अनुभव येईल. तुम्ही जर कन्स्ट्रक्शन किंवा ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करत असाल तर नवीन टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. शुभ लाभाचा योग आहे पण मेहनतीला तोड नाही. कामात फोकस करा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल.

वृश्चिकसाठी शनिवार फारसा ठिक नाही. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही त्वरित तपासणी करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यामुळे लवकर बरे व्हाल. तब्येत ठिक नसतानाही काही कामं करावी लागणा आहेत. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक वातावरण असून सहकारी मदत करतील. तुम्ही जर अकाउंट्स, फायनान्स किंव टॅक्स कन्सल्टन्सी क्षेत्रात कार्य करत आहात तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

धनू राशीसाठी शनिवार चांगला आहे. तुम्ही काही धाडसी निर्णय घेणार आहात आणि घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला पाठिंबा देईल. सासरकडून लाभाची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ काही सामाजिक कामात जाणार आहे. तुम्ही सोलर एनर्जी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करत असाल तर मागणी वाढून नफा होईल. तुम्ही आता व्यवसायात टीम वाढवा कारण सगळी कामे तुम्ही केली तर ताणतणाव वाढेल.

मकर राशीसाठी शनिवार चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश आहे. नोकरीच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे. तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात यश मिळेल. प्रोजेक्ट पटापट मार्गी लागणार असून नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तुम्ही ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल किंवा लॉजिस्टिक्स क्षेत्रात असाल तर प्रवासाचा योग आहे पण हा प्रवास आर्थिक लाभ देणार. संध्याकाळी वादविवादापासून शक्यतो खूप दूर राहा.

कुंभ राशीसाठी शनिवार फारसा ठिक नाही कारण अचानक वाद किंवा विरोधकांचा त्रास वाढेल. तुम्ही जे काही काम केले आहे त्यात रिवर्क येईल त्यामुळे तुम्ही निराश व्हाल. मन अस्वस्थ करणारी बातमी ऐकून अचानक प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही फार्मा किंवा केमिकल व्यवसायात असाल तर महत्त्वाची कागदपत्र व्यवस्थित ठेवा अचानक पेपरची गरज लागेल आणि ते मिळाले नाहीत तर काम थांबेल.तुम्ही अत्यंत संयमाने आणि सावधपणे काम करा.

मीन राशीसाठी शनिवार फारसा ठिक नाही. वैवाहिक जीवनातील समस्या वाढणार आहेत. तुम्हाला एकटे वाटू शकते, ताणतणाव वाढेल. सासरकडील मंडळींसोबत व्यवहार टाळा, अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात. तुम्ही हेल्थकेअर, मेडिकल किंवा इम्पोर्ट-एक्सपोर्ट क्षेत्रात असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेवून काम करा किंवा समस्या सोडवा. धार्मिक कामासाठी जास्त खर्च करणार आहात. प्रवासाचा योग असून त्यात सावध राहा.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.... आणखी वाचा

ad