Mar, 13 2026

देशातील 22 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा


Image Source By : Digital Satta

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: भारतीय हवामान खात्याने देशातील 22 राज्यांमध्ये आणखी 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानुसार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, केरळमध्ये 197 रस्ते बंद आहेत. तामिळनाडू, दिल्ली, मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, काही ठिकाणी मुसळधार आणि इतर ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. देशातील 18 राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून 4 राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे धरण फुटल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. धरण फुटल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे किमान 7 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 197 रस्ते बंद आहेत. भारतीय हवामान खात्याने पुढील सात दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ad