Mar, 13 2026

अमरावती - नागपुरी गेट पोलिसांच्या धाडीत 31 घरगुती गॅस सिलेंडर जप्त


Image Source By : Digital Satta

अमरावती, 3 ऑगस्ट- नागपुरी गेट पोलिसांनी ताजनगर आणि इमामनगर येथे धाड टाकून अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून गॅस काढण्याचा प्रयत्न हाणून पाडला. ताजनगरयेथून १६ तर इमामनगर येथून १५ सिलेंडर असे एकूण ३१ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. मशीनच्या सहायाने गॅस काढला जात असल्याचा प्रकार नागपुरी गेट पोलिसांच्या हद्दीत इममानगर येथे उघडकीस आला. पोलिसांनी गॅस सिलेंडरसह एकूण्या १८ हजार ९०० रुपयांचे साहित्य जप्त केले. इमामनगर येथील भोहजाद परवेज अब्दुल जहीर (३७) याच्याविरुध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरमधून मशीनच्या सहायाने गॅस भरण्याचा केला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी युनायटेड कंपनीची मशीन (किं ५ हजार), दोन सिलेंडर अर्धवट भरलेले (कि १४००), १५ सिलेंडर, त्यातील पाच भरलेले (किं ५०००) असा एकूण १८ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी कलम ३, ७७ जिवनावश्यक व वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरी गेट पोलिसांनी दुसऱ्या कारवाईत ताजनगर भागातून १६ सिलेंडर जप्त केले आहेत. त्यापैकी ७ भरलेले तर ९ खाली सिलेंडर आहेत. या ठिकाणी अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून मशीनच्या सहायाने गॅस काढला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मशीनसह, पाईप, १६ सिलेंडर असे एकूण ६५ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले. आरोपी अहमदखान हमीदखान (३८)डॉ. अजय जाधव, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार. या कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व बाजार परवाना विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ad