Mar, 13 2026

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या


Image Source By : Digital Satta

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या


T20 World Cup 2026 Ind Vs Ned Predicted Playing 11 Washington Sundar Arshdeep Singh And Siraj May In Squad

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या

IND vs NED Playing 11 News : भारतीय संघाचा नेदरलँडसोबत सामना आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. तीन जणांना आजच्या सामन्यात संधी मिळू शकते.

भारतीय संघाची आज, बुधवारी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील गटातील शेवटची लढत नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. 'सुपर-८' फेरीपूर्वी सलामीवीर अभिषेक शर्माला लय गवसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. गेल्या १८ महिन्यांत जगातील सर्वांत धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अभिषेकला मायदेशात होत असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अद्याप छाप पाडता आलेली नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, पोटाच्या संसर्गामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले; पण सलग दुसऱ्यांदा त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला ईशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने अभिषेकच्या अपयशाचा संघाच्या निकालावर परिणाम झाला नाही.

आज साखळी फेरीमधील अखेरचा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये

मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याचे कारण भारतीय संघाने आता सुपर८ मधील आपले स्थान निश्चित केले आहे. एका आठवड्यात भारताला वर्ल्ड कपचे तीन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे नेदरलँडविरूद्धच्या सामन्यामध्ये तीन महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे संघात कोणाला एन्ट्री मिळणार जाणून घ्या. आजचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता टॉस होणार असून सात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?

भारतीय संघातून आज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि वरूण चक्रवर्ती यांना विश्रांती दिली जाऊ शकते. तर यांच्या जागी संघामध्ये मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड होऊ शकते. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगला बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यामध्ये त्यांची प्लेइंग११ मध्ये निवड होणार आहे.

IND vs PAK : सरडा परवडला! शोएब अख्तरचा 24 तासांच्या आत यू-टर्न, मोहसीन नक्वी पाकिस्तानला तर...

सूर्यकुमार यादव (C), इशान किशन (WK), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Rohit Sharma : नम्रता संभेराव म्हणाली, तुमच्याशी मराठीत बोलते; रोहित शर्माचं उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?

Imran Khan यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह जगभरातील 14 क्रिकेटपटू एकवटले, पाकिस्तान सरकारला पाठवले पत्र

T-20 World Cup 2026: अब की बार, कांगारुंची शिकार; ऑसींच्या पॅकअपमागे भारताचे 2 शिलेदार, जयसूर्याचा मास्टरस्ट्रोक

T-20 World Cup 2026: वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर! झिम्बाब्वे जाएंट किलर; प्रथमच सुपर-8 मध्ये धडक, कांगारुंचं पॅकअप

Rashid Khan : करामीत खानच्या शिरपेचाना मानाचा तुरा, राशिद खानची टी-20 क्रिकेटमध्ये 700 विकेट पूर्ण

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad