Mar, 13 2026

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?


Image Source By : Digital Satta

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?


T20 World Cup 2026 India Vs Netherlands Match In Narendra Modi Stadium

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?

IND vs NED News : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या साखळी फेरीतील भारतीय संघाचा आज शेवटचा सामना होणार आहे. सुपर-८ फेरीमध्ये भारतीय संघाने धडक मारली आहे. हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे.

: वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वी भारताचा सुपर एटमधील प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र हा सामना नेदरलँड्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. जागतिक क्रिकेटची ताकद असलेल्या भारताविरुद्धचा सामना आणि तोही १ लाख ३२ हजार क्षमतेच्या स्टेडियमवर हेच नेदरलँड्स संघासाठी स्वप्नवत आहे. त्यामुळे हा सामना 'वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील लढतीपेक्षाही महत्त्वाचा आहे,' अशीच त्यांची भावना आहे.

निम्मे जरी भरले तरी आपल्या संघाच्या फुटबॉल लढतीस असलेल्या चाहत्यांपेक्षाही ही संख्या जास्त आहे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत नेदरलँड्स कायम संभाव्य विजेत्यात आघाडीवर असतात. नेदरलँड्समध्ये फुटबॉलच्या क्रिकेटचे लोकप्रियतेस आव्हानही नाही.

IND vs PAK : सरडा परवडला! शोएब अख्तरचा 24 तासांच्या आत यू-टर्न, मोहसीन नक्वी पाकिस्तानला तर...

भारतात, भारताविरुद्ध खेळणे आणि तेही जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर हेच आमच्यासाठी खूप मोठे आहे. फिफा वर्ल्ड कपमधील आमच्या सामन्यास जेवढे उपस्थित असतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त या सामन्याच्यावेळी असतील, असे नेदरलँड्स संघाचे मार्केटिंग आणि मीडिया व्यवस्थापक जॉन वान विलेट यांनी सांगितले. पुरस्कत्यांनी क्रिकेट किती मोठे आहे, हे बघायला येथे यायला हवे. मात्र त्यांना किंमतच समजलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या स्टेडियममधील ऑरेंज सीट पाहून ते जास्त सुखावले होते. नेदरलँड्स संघास क्रीडा जगतात ऑरेंज असेच संबोधले जाते. अर्थात त्यांच्या क्रिकेट आणि फुटबॉलमधील साम्य येथेच संपते.

स्पर्धा तीन दिवसांवर असताना संघास पुरस्कर्ते गवसले. अर्थातच हे पुरस्कर्ते भारतीय आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या म्हणजेच २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळीही हेच घडले होते. नेदरलँड्सच्या क्रिकेट संघास त्यांच्या देशातील काही पुरस्कर्ते आहेत. मात्र त्यातील अनेक कंपन्यांचे मालक भारतीय वंशाचे आहेत.

Yuvraj Samra Century : वर्ल्ड कपमध्ये 19 वर्षांच्या युवराजचं तुफान, शतकी खेळीने पाँटिंग-पॉलही धोबीपछाड, कुठला विक्रम रचला?

नेदरलँड्समध्ये फुटबॉलच्या लोकप्रियतेस क्रिकेट आव्हानही देण्याचा विचार करू शकत नाही, हे त्यांचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने मान्य केले. 'भारताविरुद्धच्या सामन्यातून आम्ही नेमके कुठे आहोत, ते कळणार आहे. नेदरलँड्समध्येही क्रिकेट वाढत आहे. अर्थात फुटबॉल हाच आमच्या देशातील प्रमुख खेळ आहे. तेवढी लोकप्रियता कदाचीत आम्ही गाठणारही नाही,' अशी कबुली त्याने दिली. अर्थात आमच्या देशातील क्रिकेट वाढवण्याची जबाबदारी आमचीच आहे. आम्ही चांगला खेळ केला, तर लोकप्रियता वाढू शकेल. अधिकाधिक मुले क्रिकेट खेळतील. या स्पर्धेचे आमच्या देशात थेट प्रक्षेपण होत आहे. जागतिक क्रिकेटची ताकद असलेल्या भारताविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यास खेळाचे चाहते वाढतील आणि पुरस्कर्तेही असे त्याने सांगितले.

हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Imran Khan यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह जगभरातील 14 क्रिकेटपटू एकवटले, पाकिस्तान सरकारला पाठवले पत्र

T-20 World Cup 2026: अब की बार, कांगारुंची शिकार; ऑसींच्या पॅकअपमागे भारताचे 2 शिलेदार, जयसूर्याचा मास्टरस्ट्रोक

T-20 World Cup 2026: वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर! झिम्बाब्वे जाएंट किलर; प्रथमच सुपर-8 मध्ये धडक, कांगारुंचं पॅकअप

Rashid Khan : करामीत खानच्या शिरपेचाना मानाचा तुरा, राशिद खानची टी-20 क्रिकेटमध्ये 700 विकेट पूर्ण

IND vs PAK : सरडा परवडला! शोएब अख्तरचा 24 तासांच्या आत यू-टर्न, मोहसीन नक्वी पाकिस्तानला तर...

Yuvraj Samra Century : वर्ल्ड कपमध्ये 19 वर्षांच्या युवराजचं तुफान, शतकी खेळीने पाँटिंग-पॉलही धोबीपछाड, कुठला विक्रम रचला?

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad