Mar, 13 2026

IND vs PAK : आयसीसी भारत-पाक वादामुळे वर्ल्डकपबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मोठी माहिती समोर


Image Source By : Digital Satta

IND vs PAK : आयसीसी भारत-पाक वादामुळे वर्ल्डकपबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मोठी माहिती समोर


T20 World Cup Ind Vs Pak Conflict Future Champion Trophy 2027 And World Cup 2031 Out Of India

IND vs PAK : आयसीसी भारत-पाक वादामुळे वर्ल्डकपबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मोठी माहिती समोर

IND vs PAK News : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा सुरु असताना मोठी माहिती समोर आली आहे. भारत-पाक संघर्षामुळे आता आयसीसी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ सुरू असून भारत आणि श्रीलंका हे दोन देश प्रायोजक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत कलह चर्चेत राहिला. पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळण्यासाठी नकार कळवला होता. त्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही नकार दिला होता. आयसीसीने त्यांना वेळ दिला पण बांगलादेश बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम रहिलं. अखेर आयसीसीने स्कॉटलँड संघाचा समावेश केला. त्यानंतर पाकिस्तान भारताविरूद्धचा सामना न खेळण्यासाठी आडून राहिलं होतं. शेवटी आयसीसीने मध्यस्थी करत सामना न खेळल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत माहित दिली. अखेर सामन्याला दोन ते दिवस बाकी असताना पाकिस्तानच्या संघाने होकार कळवला. १५ फेब्रुवारीला हा सामना पार पडला, भारतीय संघाने या सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळवला होता. मात्र एकंदरित दोन्ही देशांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

तणाव पाहता आयसीसी आगामी टूर्नामेंट भारतामधून बाहेर दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याच्या विचारात आहेत. ऑस्ट्रेलियामधील 'द एज' या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२९ आणि

भारताबाहेर ठेवण्याचा विचार सुरू आहे. याचं कारण म्हणजे भारत-पाकमधील वाद, त्यामुळे आयसीसीसह भारत-पाक यांच्यात डील झाली आहे. दोन्ही संघ २०२७ पर्यंत न्यूट्रल ठिकाणावर आयसीसीच्या टूर्नामेंटचे सामने खेळतील.

Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या

आता अशी परिस्थिती आहे की, भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारतात खेळणार नाही. बांगलादेशनेही आता यायला नकार दिल्यामुळे हे स्पष्ट होतं की भविष्यात दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नाही. पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये तणावाची स्थिती आहे. भारतीय खेळाडू पाकिस्तानसोबत खेळताना खेळाडूंसोबत हस्तांदोलन करत नाही.

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या

दरम्यान, भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्षामुळे नवीन वाद उफाळू शकतो. आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या वादांमुळे आयसीसी आपल्या स्पर्धांसाठी बॅक अप प्लॅन आखत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता आगामी आयसीसीच्या स्पर्धांचे आयोजन आशियाई देशात होतं की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या

Rohit Sharma : नम्रता संभेराव म्हणाली, तुमच्याशी मराठीत बोलते; रोहित शर्माचं उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?

Imran Khan यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह जगभरातील 14 क्रिकेटपटू एकवटले, पाकिस्तान सरकारला पाठवले पत्र

T-20 World Cup 2026: अब की बार, कांगारुंची शिकार; ऑसींच्या पॅकअपमागे भारताचे 2 शिलेदार, जयसूर्याचा मास्टरस्ट्रोक

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad