Loading
IND vs SA : भारताच्या पराभवावर सुनील गावस्कर संतापले; खेळाडूचं उघडपणे नाव घेत झापलं, अक्षरला खेळवण्याची मागणी
T20 Globe Cup 2026 Former Player Sunil Gavaskar Talk On Team India Lost Match
IND vs SA : भारताच्या पराभवावर सुनील गावस्कर संतापले; खेळाडूचं उघडपणे नाव घेत झापलं, अक्षरला खेळवण्याची मागणी
Sunil Gavaskar on Team India : भारताचा पराभवावर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूचे नाव घेत झापलं आहे. त्यासोबतच अक्षर पटेल याला खेळवण्याची मागणी केली आहे.
वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा पराभव करत सुपर ८ मधील पहिला विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. या पराभवावर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचं काय चुकलं हे सांगितलं आहे.
भारतीय खेळाडूंनी ब्रेविस आणि मिलर यांच्या पार्टनरशीपमधून धडा घ्यायला हवा होता. भारताच्या खेळाडूंनी तसं केलं नाही. अति आत्मविश्वासाने मैदानात उतरत बॅट चालवत होते आणि आपल्या विकेट गमावल्या.
प्रत्येक विभागामध्ये भारतापेक्षा सरस कामगिरी केली. तिलक वर्मा चतुर खेळाडू आहे पण कालच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने त्याने आऊट झाला ते पाहून मी निराश झालो. त्याने काही वेळ मैदानावर थांबायलं हवं होतं. आता झिम्बाव्बेच्या सामन्यात अक्षर पटेलला संधी द्यावी, असं
ZIM vs WI : वानखेडेवर इतिहास घडणार, झिम्बाब्वे चॅम्पियन विंडीजला भिडून जायंट किलर ठरणार; कुठे आणि किती वाजता सामना?
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जसप्रीत बुमराहने क्विंटन डीकॉक आणि रायन रिक्लेटन यांना झटपट माघारी पाठविले, तर अर्शदीपसिंगने धोकादायक एडन मार्करमचा अडथळा दूर केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ४ घटकांत ३ बाद २० अशी स्थिती झाली होती. यानंतर डिवॉल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलरने ५१ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी रचून लढतीचे चित्र पालटले. मिलरने ३५ चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांसह ६३ धावा केल्या, तर ब्रेव्हिसने २९ चेंडूंत तीन चौकार व तीन षटकारांसह ४५ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने २४ चेंडूंत तीन षटकार व एक चौकारासह नाबाद ४४ धावा करून दक्षिण आफ्रिकेला ७ बाद १८७ धावांपर्यंत पोहोचवले.
IND vs SA : टीम इंडियामध्ये विराटच्या जागी आलेला खेळाडू कोणाच्या वशिल्यावर? वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी, पाहा कोण
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात ईशान किशन शून्यावर बाद झाला. पुढच्या षटकात तिलक वर्मा माघारी परतला. दोन चौकार व एक षटकार मारल्याने अभिषेक शर्मा तारणहार ठरणार, ही आशाही फोल ठरली. पहिल्या सहा षटकांत भारताची ३ बाद ३१ अशी स्थिती होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जोडीही फार यशस्वी ठरली नाही. वॉशिंग्टन सुंदर केवळ एक षटकार मारून बाद झाला, तर दहाव्या षटकात सूर्यकुमारचा संघर्ष थांबला. त्या वेळी भारताची ९.१ षटकांत ५ बाद ५१ अशी स्थिती झाली होती. यानंतर हार्दिक पंड्या, रिंकू सिंह आणि अर्शदीपसिंग यांना केशव महाराजने एकाच षटकात माघारी पाठविले. शिवम दुबेने जीवदानाचा फायदा घेऊन तीन षटकार व एका चौकारासह ४२ धावा केल्या. यान्सेनने सलग दोन चेंडूंवर दुबे आणि जसप्रीत बुमराहला बाद करून भारताला १११ धावांत रोखले.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
David Miller: सामनावीर मिलरने भारताच्या जखमेवर मीठ चोळलं, टीम इंडियाला पराभवाचा झटका दिल्यानंतर काय बोलला?
ZIM vs WI : वानखेडेवर इतिहास घडणार, झिम्बाब्वे चॅम्पियन विंडीजला भिडून जायंट किलर ठरणार; कुठे आणि किती वाजता सामना?
IND vs SA : टीम इंडियामध्ये विराटच्या जागी आलेला खेळाडू कोणाच्या वशिल्यावर? वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी, पाहा कोण
Vaibhav Sooryavanshi : सूर्यवंशीचं 'वैभव' आणखी वाढलं, बिहार सरकारकडून 50 लाखांचं बक्षीस, 15 व्या वर्षी किती कोटींचा मालक?
IND vs SA : वर्ल्ड कपच्या 19 वर्षात फक्त 3 वेळा भारताचा पाठलाग करताना विजय, हिरो फक्त एकच तो म्हणजे... ना धोनी ना रोहित मग कोण?
IND vs SA : 'अरे काय IPL आहे का'; भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन भडकला, गंभीरवर निशाणा साधत म्हणाला...
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :