Loading
IND vs WI : भारताकडून झिम्बाब्वेचा करेक्ट कार्यक्रम, आता वेस्ट इंडिजचा नंबर; कधी आणि कुठे आहे सामना?
Ind Vs Wi Live Streaming T20 World Cup 2026 When And Where To Watch The country Vs West Indies Match Online On Tv Mobile App Details
IND vs WI : भारताकडून झिम्बाब्वेचा करेक्ट कार्यक्रम, आता वेस्ट इंडिजचा नंबर; कधी आणि कुठे आहे सामना?
IND vs WI News : वर्ल्ड कपमध्ये सुपर८ फेरीमधील भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना सेमी फायनलसारखा झाला आहे. कारण जो हरेल तो बाहेर आहे आणि जिंकेल त्याला सेमी फायनलचे तिकीट मिळणार आहे. हा सामना कुठे आणि केव्हा असणार जाणून घ्या.
भारताने सुपर ८ फेरीमधील दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. मात्र भारताला आता आणखी एक विजय मिळवावा लागणार आहे. दुसरा विजय मिळवण्यासाठी भारतासमोर कॅरेबियन संघाचे आव्हान असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या सामन्याच्या निकालावर ग्रुप ए मधील सेमी फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ ठरणार आहे. हा सामना नेमका केव्हा आणि कुठे होणार आहे. ज्या मैदानावर होणार आहे तिथला भारत आणि वेस्ट इंडिजचा रेकॉर्ड कस आहे जाणून घ्या.
सामना कोलकातामधील ईडन गार्डन या मैदानावर पार पडणार आहे. १ मार्च २०२६ ला संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. तर त्याआधी साडे सहा वाजता सामन्याचा टॉस असणार आहे. हा सामना जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. या मैदानामध्ये भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरूद्धचा रेकॉर्ड काही चांगला नाही. कारण या मैदानावर भारताने एकही सामना जिंकलेला नाही. विशेष म्हणजे
भारताचा पराभव झालेला आहे. त्यामुळे सूर्या अँड कंपनीला इतिहास रचावा लागणार आहे.
ENG vs NZ : वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड वि. न्यूझीलंड भिडणार, किवींची एक चूक अन् पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दारे उघडी
भारतासाठी चांगली बातमी म्हणजे फंलदाज पुन्हा फॉर्ममध्ये आले आहेत. कारण झिम्बाब्बेविरूद्धच्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी तुफान फलंदाजी केली. भारताने २० ओव्हरमध्ये २५६-४ धावा केल्या होत्या. अवघ्या चार धावांनी वर्ल्ड रेकॉर्ड वाचला. वर्ल्ड कपमध्ये २६० ही सर्वोच्च धावसंख्या आहे. २००७ साली श्रीलंका संघाने ही कामगिरी केली होती. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याच संघाला हा विक्रम मोडता आलेला नाही. भारताकडे नामी संधी होती, मात्र दुर्दैवाने चार धावांनी हा रेकॉर्ड राहिला.
IND vs ZIM : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हरवलं पण सेमी फायनलचं तिकीट नाहीच, नेमकं कसं असणार समीकरण
दरम्यान, भारतासाठी सर्वात मोठी अडचण गोलंदाजी आहे. कारण झिम्बाब्वे संघाने १८४-६ धावा केल्या होत्या. तस पाहायला गेलं तर त्यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी त्यांनी १५० च्या आतमध्ये ऑल आऊट केले असते तर गोलंदाजीतील ताकद दिसून आली असती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना भारतीय गोलंदाजांना आक्रमण करता यायला हवे.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ENG vs NZ : वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड वि. न्यूझीलंड भिडणार, किवींची एक चूक अन् पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दारे उघडी
IND vs WI : वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी भारताला विंडीजविरूद्ध विजय हवाच, पण पावसाने सामना रद्द झाल्यास कोणाला एन्ट्री?
IND vs ZIM : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हरवलं पण सेमी फायनलचं तिकीट नाहीच, नेमकं कसं असणार समीकरण
Rinku Singh Father Death : रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर, पिता खानचंद सिंग यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी
Arshdeep Singh : विंडीजच्या फलंदाजांना नुसत्या शिव्या, अर्शदीपने सांगितला पप्पांचा किस्सा, हॉटेल रुममध्ये काय घडलं?
IND vs ZIM : भारत जिंकला, पण 22 वर्षाच्या पोराने झुंजवलं, वर्ल्ड कपमध्ये एकदाही आऊट नाही, नाबाद 97 ठोकणारा युवा खेळाडू आहे तरी कोण?
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :