Loading
IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्याआधी मैदानावर सगळीकडे फवारलं स्पेशल केमिकल, अमेरिकेहून तातडीने मागवलेलं - t20 international cup 2026 dew core chemical to be sprayed on the field before india-zimbabwe match - Maharashtra Times
T20 Globe Cup 2026 Dew Core Chemical To Be Sprayed On The Field Before Bharat zimbabwe Match
IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्याआधी मैदानावर सगळीकडे फवारलं स्पेशल केमिकल, अमेरिकेहून तातडीने मागवलेलं
IND vs ZIM Match : भारत पाक सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्यामध्ये मैदानावर सगळीकडे स्पेशल केमिकल फवारलं आहे. नेमकं कशासाठी जाणून घ्या.
वर्ल्ड कप २०२६ मधील सुपर८ फेरीमधील भारतीय संघाचा आज दुसरा सामना पार पडणार आहे. चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होणार असून भारतीय संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. सूर्यकुमार अँड कंपनी या सामन्यासाठी सज्ज असणार असेल असून त्याआधी एक मोठी माहिती समोर आली आहे. चेपॉकव होणाऱ्या सामन्यासाठी अमेरिकेहून एक खास केमिकल मागवण्यात आले आहे. ते नेमके कशासाठी मागवले आहे? त्याचा वापर नेमका कशासाठी करण्यात येणार हे जाणून घ्या.
चेन्नईचे हे स्टेडियम तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन चालवत आहे. आजच्या सामन्यासाठी एक केमिकल मागवलेय, ज्याची दव कमी करण्यासाठी मदत होणार आहे. या केमिकलचे नाव '
' असे असून हे मैदानात टाकण्यात आले आहे. कारण चेन्नईमध्ये वाढत्या तापमानामुळे संध्याकाली गवतावर मोठ्या प्रमाणात दव येते, त्यामुळे सर्वत्र मैदान ओले होते. याचा फायदा दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या संघाला होतो. त्यामुळे अशा वेळी टॉसची भूमिका महत्त्वाची ठरते.
Sabba Manzer : अशाने तुम्हाला वर्ल्डकप मिळायचा नाही, पाक कर्णधार सलमान आगाची बायको चिडली, पाकिस्तानींना चांगलंच सुनावलं
सामन्यामध्ये असा एका; संघाला फायदा होऊ नये यासाठी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने यंदाच्या वर्ल्ड कपआधी स्टेडियमल तयार करताना हे केमिकल मागवले होते. सामन्याआधी दोन दिवस मैदानात हे केमिकल मारण्यात आले आहे.आज दुपारीसुद्धा हे केमिकल मारण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे.
T20 International Cup WI vs SA : वर्ल्ड कपमधील दुसरा सेमी फानयल संघ ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय महत्त्वाचा? दक्षिण आफ्रिका हरली तर एकच नंबर, पण...
आजच्या सामन्यामध्ये दव फॅक्टरमुळे स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघ आपल्या अंतिम ११ मध्ये स्पिनर्सला जागा देतील. त्यामुळे दवाचा एकाच संघाला फटका बसू नये यासाठी हे सर्व केले आहे. आता रात्रीच हे भारतीय संघासाठ फायद्याचं की तोट्याचं ठरणार हे समजणार आहे.
IND vs ZIM : टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरूद्ध मास्टरप्लॅन, कोच गंभीरचा निर्णय, प्लेइंग 11 मध्ये कॅप्टन सूर्याची बदलली जागा
भारत आणि झिम्बाब्वेमधील सामना महत्त्वाचा आहे. कारण आजचा सामना भारताने गमावला तर सेमी फायनलमध्ये जाण्याच्या रेसमधून ते बाहेर पडणार आहेत. आजच्या सामन्यात फक्त विजयच महत्त्वाचा नाहीये, सामना किती फरकाने जिंकतात हे महत्त्वाचे आहे. कारण पुढे याचा फायदा होणार आहे. सेमी फायनलच्या पात्रतेसाठी गुण समाना झाल्यावर पात्रतेवर संघांना एन्ट्री आहे.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Ranji Trophy Final 2026 : रणजी फायनलच्या पहिल्याच दिवशी वाद, कॅप्टनने थेट खेळाडूच्या अंगावर जात मारली ढुशी, Video समोर
Sabba Manzer : अशाने तुम्हाला वर्ल्डकप मिळायचा नाही, पाक कर्णधार सलमान आगाची बायको चिडली, पाकिस्तानींना चांगलंच सुनावलं
IND vs ZIM T20 Playing 11 : भारतीय संघातून झिम्बाब्वेविरूद्ध दोघांचा पत्ता होणार कट, प्लेइंग 11 मध्ये दोघांची एन्ट्री फिक्स, पाहा कोण
T20 World Cup WI vs SA : वर्ल्ड कपमधील दुसरा सेमी फानयल संघ ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय महत्त्वाचा? दक्षिण आफ्रिका हरली तर एकच नंबर, पण...
IND vs ZIM : टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरूद्ध मास्टरप्लॅन, कोच गंभीरचा निर्णय, प्लेइंग 11 मध्ये कॅप्टन सूर्याची बदलली जागा
Arjun Tendulkar Saaniya Chandhok: प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरला पोहोचले अर्जुन-सानिया; तेंडुलकर कुटुंबाच्या आनंदात अंबानीही सामील
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :