Mar, 13 2026

Memes: ‘झिम्बाव्वेला पाहून भिती वाटतेय’, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला हरवलं, ZIM vs SL मॅचवर मीम्स व्हायरल


Image Source By : Digital Satta

या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिली फलंदाजी करून १७८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेची अनुभवी फिरकी गोलंदाजी पाहाता झिम्बाव्वे हे आव्हान पुर्ण करेल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. पण त्यांनी तोडफोड बॅटिंग करून ६ विकेट राखून विजय मिळवला.


या मॅचमध्ये झिम्बाव्वेच्या ओपनर्सनं कमाल केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८ ओव्हरमध्येच ६९ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकन गोलंदाजी बॅकफुटवर गेली. अन् मग संयमी फलंदाजी करून हळूहळू त्यांनी आव्हानाच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू ठेवलं.

शेवटच्या ओव्हर्समध्ये झिम्बाव्वेनं एकामागून एक दोन विकेट गमावले. आधी सिकंदर रझा २६ बॉलमध्ये ४५ धावा करून बाद झाला तर त्यानंतर लगेच Tashinga Musekiwa मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

A post shared by Stuart Little (@stuartlittle1252)

A post shared by Stuart Little (@stuartlittle1252)

लेखकाबद्दलमंदार गुरव"मंदार हा एक कुशल कंटेन्ट रायटर आहे. तो व्हायरल सेक्शनसाठी लिखाण करतो. त्याच्याकडे ७ वर्षांचा अनुभव आहे. व्हायरलसोबतच तो खेळ, मनोरंजन आणि राजकारण या विषयांवरही लिखाण करतो. आपल्या वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी तो विविध विषयांवर संशोधन करतो. यापूर्वी त्याने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे.

मंदारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला खूप आवडते. सोबतच त्याने विनोदी कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा यांसारख्या विविध विषयांची पुस्तकं वाचली आहेत. वाचनासोबतच चित्रपट आणि नाटके पाहायला सुद्धा आवडतात. विशेषत: भय आणि विनोद या पठडीत मोडणाऱ्या कलाकृतींमध्ये विशेष रस आहे. तसेच मंदार फावल्या वेळेत कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे.

मंदार आपल्या वाचकांची आवड आणि रूची समजून त्या अनुशंगाने लिखाण करतो. मंदारच्या लिखाणाची शैली ही फारच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे त्याचे लिखाण लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले लोक वाचू शकतात. वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी मंदार वचनबद्ध आहे. आपल्या सर्जनशील लिखाण शैलीमुळे तो टीममधील एक महत्वाचा सदस्य आहे."... आणखी वाचा

ad