Loading
maharashtra weather updates mumbai temperatures will slightly decrease after 24 feb ; मुंबईत पाऱ्याची छत्तीशी! 'संडे' ही तापदायक, 24 फेब्रुवारीनंतर तापमान कमी होण्याचा अंदाज | Maharashtra Times
Maharashtra Weather Updates Mumbai Temperatures Will Slightly Decrease After 24 Feb
Mumbai Weather: मुंबईत पाऱ्याची छत्तीशी! 'संडे' ही तापदायक, 24 फेब्रुवारीनंतर तापमान कमी होण्याचा अंदाज
Weather News 22nd February 2026: मुंबईकरांना उन्हाच्या झळा... शनिवारी तापमान ३६.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. २४ फेब्रुवारीनंतर तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या उकाड्याने शनिवारी उच्चांक नोंदवला. सांताक्रूझ येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक आहे. सबब मुंबईत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. २४ फेब्रुवारीनंतर तापमानात अंशतः घट अपेक्षित आहे.
अधिकारी सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व आणि आग्नेय दिशांकडून वारे वाहात असून समुद्रावरून येणारे वारेही उशिरा येत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोकण विभागातच शनिवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून मोठ्या फरकाने अधिक होता. कुलाबा येथेही सरासरीपेक्षा कमाल तापमान ४.६ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
Aaditya Thackeray: राज्यसभेची ती एक जागा कुणाची? आदित्य ठाकरेंचं स्पष्ट मत, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले...
हर्णे येथेही सरासरीपेक्षा ५.३ अंशांनी तापमान अधिक होते तर रत्नागिरी येथे ४.४ अंशांनी
अधिक होते. केवळ कमालच नाही तर वातावरणात आर्द्रता असल्याने किमान तापमानाचा पाराही चढा आहे. कुलाबा येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे २.७ अंशांनी तर सांताक्रूझ येथे ३.७ अंशांनी अधिक होते.
Budget Session 2026: विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी; सत्ताधाऱ्यांच्या कोंडीची 'मविआ'लाही संधी, कोणते मुद्दे गाजणार?
फेब्रुवारीच्या अखेरीस ऋतुबदलामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत असतो. गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा ३८.७अंश सेल्सिअसवर नोंदला गेला. तर फेब्रुवारीतील नोंदीनुसार
३९.६ अंश होते. तर कुलाबा येथे गेल्या वर्षी ३६.८ अंश सेल्सिअस इतके फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. आत्तापर्यंतचे फेब्रुवारीतील विक्रमी कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, माझी वसुंधरा सन्मान सोहळ्यात सुनेत्रा पवारांचं भाषण
Santacruz-Chembur Link Road: लिंक रोडची 12 वर्षांतच दुरवस्था; सीएसएमटी, एलबीएस, टिळकनगर मार्गावरील पुलांना गंज, गर्डरला तडे
Aaditya Thackeray: राज्यसभेची ती एक जागा कुणाची? आदित्य ठाकरेंचं स्पष्ट मत, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले...
Maharashtra Live News 22nd February 2026: महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर
Budget Session 2026: विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी; सत्ताधाऱ्यांच्या कोंडीची 'मविआ'लाही संधी, कोणते मुद्दे गाजणार?
Maharashtra Politics: पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार?
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :