Loading
Samantha Ruth Prabhu On First Divorce And Raj Nidimoru; घटस्फोटानंतर आयुष्य झालेलं उद्ध्वस्त, प्रेमावरचा विश्वास उडालेला; सामंथा म्हणाली, 'राजने मला चांगली व्यक्ती बनवलं'
Samantha Ruth Prabhu Talks About Divorce With Naga Chaitanya And Marriage With Raj Nidimoru
Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर आयुष्य झालेलं उद्ध्वस्त, प्रेमावरचा विश्वास उडालेला; सामंथा म्हणाली, 'राजने मला चांगली व्यक्ती बनवलं'
Samantha Ruth Prabhu On Divorce And Marriage With Raj Nidimoru : सामंथा रुथ प्रभूनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पहिल्या घटस्फोटाबद्दल आणि दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सामंथाने काही महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
सामंथाने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं. सामंथा म्हणाली की, 'जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मला वाटलं नव्हतं की, मी पुन्हा कोणावरही विश्वास ठेवू शकेन. पण सुदैवानं, मी स्वतःला इतकं कमकुवत होऊ दिलं नाही. मी पुन्हा प्रेम आणि मैत्रीवर विश्वास ठेवला. आज राजसारखा माणूस माझ्या आयुष्यात आहे आणि त्याने मला चांगली व्यक्ती बनवलं आहे'
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाच्या लुकची चाहत्यांना भुरळ
'माझ्या जवळच्या लोकांनाही हा बदल जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी, मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटले. नंतर, तिनं मला एक व्हॉइस नोट पाठवली की, 'खूप वेळाने जाणवलं की, तुला आता श्वास घेण्यास त्रास होत नाहीये.' मी आता कसलाच दिखावा करत नाही' असं सामंथा पुढे म्हणाली.
Adish Vaidya : 'रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?' चाहतीच्या प्रश्नावर भडकला आदिश वैद्य; म्हणाला, 'तिला प्रेम मिळालं यासाठी...'
२०१० मध्ये आलेल्या 'ये माया चेसावे' या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली, त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यने नंतर २०२४ मध्ये शोभिता धुलिपालाशी लग्न केलं.
'माझ्या आयुष्याची खरी हिरोईन!' Tharala Tar Mag फेम अर्जुनची पत्नीसाठी खास पोस्ट
सामंथा आणि राज यांची पहिली भेट २०२१ मध्ये 'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनदरम्यान झाली. सामंथा आणि राज यांनी २०२४ मध्ये 'सिटाडेल' मध्ये एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या
चर्चा सुरू झाल्या. १ डिसेंबर २०२५ रोजी सामंथा आणि राज यांनी कोइम्बतूरमध्ये लग्न केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली.
"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Tara Sutaria : 'नवीन सुरुवात...' वीर पहारियासोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तारा सुतारियाची पोस्ट; अभिनेत्रीच्या अंगठीनं वेधलं लक्ष
Nirahua Marriage: 'आई वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावलं, मी कधीच बायकोवर प्रेम नाही केलं, कर्तव्य म्हणून...' भोजपुरी अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा
Dhurandhar 2 मध्ये 'बडे साब'च्या भूमिकेत इम्रान हाश्मी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Dhairya Gholap sister :'माझे बाबा बोर्डात आले होते त्यामुळे...', Forbes 40 under 40 मध्ये बहिणीचं नाव आल्यानंतर धैर्य घोलपची खास पोस्ट
Adish Vaidya : 'रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?' चाहतीच्या प्रश्नावर भडकला आदिश वैद्य; म्हणाला, 'तिला प्रेम मिळालं यासाठी...'
Aamir Khan Family : मौलाना आझाद यांचा नातेवाइक आहे मिस्टर परफेक्शनिस्ट, पणजोबांचा वारसा जपण्यासाठी ठेवलंय मुलाचं नाव,आमिर खानच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती नसतील या गोष्टी
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :