Loading
Maharashtra Live News 20 February 2026: राज्यातील ताज्या घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर
Breaking News Live 20th February 2026 Bhiwandi Mayor Election Dcm Ajit Pawar Death Updates Maharashtra Weather
Maharashtra Live News 20 February 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर
Marathi Live News: गुरुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात अभिवादनाचे विविध रंग अनुभवायला मिळाले. त्याचबरोबर, ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करून शिवजयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे गडावर मोठी चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. गडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ अचानक ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Pune News: “माझ्याही घरात मुली…” राहुल कुल यांचे स्पष्टीकरण
भिगवण येथे घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. संबंधित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलीच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तपासाची माहिती कुटुंबाला देऊन त्यांना सहकार्य करावे, अशी सूचनाही पोलिसांना केल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास कुटुंबीयांची भेट घेऊन मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. तळेगावकर यांच्या सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) बीडकडे करण्यात आली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला असून तडजोडीनंतर २० हजारांवर सौदा ठरल्याची माहिती आहे. उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Bhiwandi Deputy Mayor: भिवंडीमध्ये काँग्रेसची बाजी, उपमहापौरपदी मोमीन तारिक अब्दुल बारी
भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली असून महापौरपदी नारायण चौधरींची निवड झाली आहे. दरम्यान, भिवंडीच्या उपमहापौर पदी कॉंग्रेसचे मोमीन तारिक अब्दुल बारी विजयी झाले आहेत. त्यांना 43 मते मिळाली आहेत.
Bhiwandi Deputy Mayor Elections: शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या बाजूने शिवसेनेचे १२ आणि सपच्या सहा नगरसेवकांचे मतदान. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेत कोणार्कला दिला पाठिंबा.
Bhiwandi Deputy Mayor: उपमहापौर पदासाठी निवडणूक सुरु
भिवंडीत महापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, सेक्यूलर फ्रंटच्या नारायण चौधरींनी बाजी मारल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता उपमहापौर पदासाठी निवडणूक सुरु झाली आहे.
Bhiwandi Mayor: भिवंडीत भाजपला मोठा धक्का, 48 मतांनी नारायण चौधरींनी मारली बाजी
भिवंडीत महापौर पदासाठी आज निवडणूक पार पडसी असून, भाजपला मोठा धक्का मिळाला आले. सेक्यूलर फ्रँटचे नारायण चौधरींनी बाजी मारली आहे.
Bhiwandi Mayor: महापौर पदासाठी ६ उमेदवारांचे अर्ज मागे
भिवंडीत महापौर पदासाठी निवडणूकीला सुरुवात झाली असून 6 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत आणि सध्या तीन उमेदवार रिंगणात आहेत.
Sunil Shelke: ज्या चौकात बोलवाल तिथे येईन, आरोप खोटे निघाल्यास पाय धरेन; सुनील शेळकेंचे BJPला आव्हान
Ranjana Nagpurkar: धनंजय मुंडेंवर १७ लाखांच्या व्यवहारासह पिस्तूल लावल्याचा गंभीर आरोप
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी एका महिलेचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर पुढे येत रंजना नागपूरकर यांनी राष्ट्रवादीचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Akhil Chitre: मुंबईत बांगलादेशी असतील तर जबाबदारी कुणाची?
Vasai Crime: वसईत ४७ वर्षीय व्यावसायिक ठार, आरोपी नूर खान अटकेत
विरुद्ध दिशेने दुचाकी चालवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने भीषण रूप धारण करत ४७ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना वसई पश्चिम येथील अंबाडी रोडवरील खाऊगल्ली परिसरात सोमवारी (१६ फेब्रुवारी २०२६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पुण्यातले सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त, शिवनेरीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना Ajit Pawar यांची आठवण
Nagpur News: रात्रभर अंगणवाडीत अडकलेला चार वर्षांचा हिमांशू
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील बोरकर लेआऊट येथे घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. चार वर्षांचा निरागस हिमांशू विश्वजित बागडे हा चिमुकला रात्रभर अंगणवाडीच्या बंद खोलीत कोंडला गेला होता. सुदैवाने सकाळी तो सुरक्षित सापडला; मात्र त्या एका रात्रीत त्याच्या कुटुंबावर काय बीती असेल, याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.
Buldhana Crime: सावकारी जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या
दीड लाख रुपये व्याजाने घेऊन शेतजमीन गहाण ठेवली. मात्र सावकार जमीन बळकवण्या आधीच शेतकऱ्याने रक्कम परत केली .सावकारांनी वीस लाख रुपय अतिरिक्त रक्कम मागत वेळोवेळी त्रास दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. खामगाव शहरानजीक वाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली. भास्कर लक्ष्मण तायडे (वय ५५) असे सावकारपीडित शेतकऱ्याचे नाव आहे.
Prakash Ambedkar: मोदींवर ट्रम्प यांचा दबाव आहे का?
केंद्र सरकार मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट कार्यक्रमांतर्गत फ्रान्सकडून ११४ राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असून, या व्यवहाराच्या पारदर्शकतेवर आणि अटींवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘संरक्षणखरेदीतील एक चूक दशकानुदशके सुरक्षा त्रुटी निर्माण करू शकते,’ असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.
Kalyan Crime: छेड काढल्याच्या संशयातून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण
दोन अल्पवयीन तरूण छेड काढत असल्याच्या कल्याणात संशयावरून कल्याणात गुरूवारी दोन गट आमने/सामने आले. या दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. राडा सो़डविण्यासाठी गेलेल्या उपचारासाठी पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाचा बीपी वाढल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवसाचे विमानतळावरचे CCTV फुटेज देण्यास नकार
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्यभरातील जनतेत तसेच कार्यकर्त्यांमध्ये विविध शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावर काय घडले, याबाबत सत्य परिस्थिती समोर यावी, या मागणीसाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले होते. मात्र केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने संबंधित माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ता नितीन यादव यांनी केला आहे.
Mumbai Crime: ३ लाखांच्या मागणीप्रकरणी वरिष्ठ पीआयसह दोघे जेरबंद
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच लाच घेताना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने टाकलेल्या सापळ्यात कुरार पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने हे जेरबंद झाले. विशेष म्हणजे झाडाझडतीदरम्यान वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमधून तब्बल ६ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Bhiwandi Mayor: भिवंडी महापौरपदाची उत्सुकता शिगेला! आज होणार मतदान
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार असलेले नाराज नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याच्या चर्चेने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
Breaking News Live: राज्यातील गुन्हेगारी, राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :