Apr, 19 2026

Latest: सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? अशोक खरात प्रकरणातील SIT कडे तक्रार


Image Source By : Digital Satta

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? अशोक खरात प्रकरणातील SIT कडे तक्रार - ashok kharat case beed man complaint to sit against rupali chakankar threat to sunetra pawar - Maharashtra Times


Ashok Kharat Case Beed Man Complaint To Sit Against Rupali Chakankar Threat To Sunetra Pawar

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? अशोक खरात प्रकरणातील SIT कडे तक्रार

भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेत आणि SIT कडून तिसऱ्या गुन्ह्यात सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी SIT ने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलाय. या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाहीत, तर अनेक कौटुंबिक वादा संदर्भात देखील तक्रारी येत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा मुख्य तपास करत असतानाच, दररोज येणाऱ्या या शेकडो तक्रारींची सत्यता पडताळून पाहणे हे SIT समोर मोठे आव्हान ठरतंय. त्यातच आता सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार SIT कडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार कोणी केली, यावर प्रतिक्रिया काय येत आहेत तेच या व्हिडिओ पाहू..

Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad