Apr, 19 2026

Ranveer Singh : नागपुरात रणवीर सिंगचा गुप्त दौरा, संघ मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट; चर्चेला उधाण


Image Source By : Digital Satta

Ranveer Singh Meets RSS Chief Mohan Bhagwat; नागपुरात रणवीर सिंगचा गुप्त दौरा, संघ मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट; चर्चेला उधाण


Ranveer Singh Meets Rss Chief Mohan Bhagwat At Sangh Headquarters In Nagpur

Ranveer Singh : नागपुरात रणवीर सिंगचा गुप्त दौरा, संघ मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट; चर्चेला उधाण

Ranveer Singh Meets Mohan Bhagwat : रणवीर सिंगने नागपूरमध्ये मोहन भागवत यांची भेट घेतली असून ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय आणि दमदार अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. मात्र, याचदरम्यान त्याचा नागपूर दौरा अचानक समोर आल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रणवीर सिंगनं थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिर येथे रणवीर सिंग अचानक दाखल झाला. येथे त्यानं संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. या भेटीचं विशेष म्हणजे, हा संपूर्ण दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. त्यामुळे रणवीरच्या या अचानक भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'नॅशनल क्रश' या टॅगमुळे माझी जाहिरातींची कामं गेली; Girija Oak ची खंत

संघ मुख्यालयात रणवीर सिंग आणि मोहन भागवत यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा केली गेली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या भेटीमुळे विविध राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. काहीजण या भेटीला केवळ शिष्टाचार म्हणून पाहत असले, तरी काहीजण त्यामागे वेगळे अर्थ शोधत आहेत. यावेळी रणवीर सिंगनं संघाच्या काही पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसंच बाल स्वयंसेवकांशीही त्यानं संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. हा संपूर्ण कार्यक्रम मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आला होता, ज्यामुळे सुरुवातीला याची माहिती बाहेर आली नव्हती. मात्र, बातमी उघड होताच ती वेगाने पसरली आणि चर्चेचा विषय बनली.

पहिल्याच दिवशी दिग्दर्शकाशी पंगा, दातांना चॉकलेट लावून हॉरर सीन; पौर्णिमेचा फेरा 3 शूटिंगचे किस्से

सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना, काही ठिकाणी या चित्रपटावर टीकाही होत आहे. काहीजण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत आहेत, तर समर्थक मात्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत रणवीर सिंगचा नागपूर दौरा आणि संघ प्रमुखांशी झालेली भेट ही केवळ योगायोग आहे की, यामागे काही वेगळा हेतू आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अधिकृत पातळीवर या भेटीबाबत स्पष्टता न मिळाल्यानं उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या तरी या भेटीनं राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Digambar Naik : 'अतुल परचुरेचं निधन झालं त्यावेळी मी तिथे नव्हतो याचं दुःख' दिगंबर नाईक यांची खंत, सांगितली अभिनेत्याची आठवण

Satish Kaul : 'महाभारत' मालिकेतील इंद्रदेवाच्या भूमिकेनं प्रसिद्धी, पडत्या काळात इंडस्ट्रीनंही पाठ फिरवली; सतीश कौल यांची हृदयद्रावक कहाणी

'नॅशनल क्रश' या टॅगमुळे माझी जाहिरातींची कामं गेली; Girija Oak ची खंत

Hardeek Joshi Transformation: राणादाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'द ट्रॅप' सिनेमाच्या स्क्रिनिंगला आलेल्या हार्दिक जोशीला ओळखणंही झालं कठीण

Delnaaz Irani on Divorce Alimony: 'पैसा नव्हे मनाची शांतता निवडली', घटस्फोटानंतर नाकारली पोटगी, आता लिव्हइनमध्ये राहतेय अभिनेत्री

Monalisa Bhosle Declared Minor: व्हायरल गर्ल मोनालिसाच्या नवऱ्या विरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, तपासात वयासंदर्भात मोठा खुलासा, कायदा काय सांगतो?

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad